Friday, April 13, 2012

ब्रेकअप

ब्रेकअप 

फोन आला तिचा 
सकाळी सकाळी
काही सांगायचे आहे
असे काहीसे म्हणाली................

आज तिच्या आवाजात 
परकेपणा होता
आजचा दिवस काहीसा
वेगळा होता....................

विचारांच्या गर्दीतून वाट काढत 
पोहचलो समुद्र किनार्यावर 
सूर्य होता मावळतीला
वाट बघत 'ती' उभी नेहमीच्या जागेवर......................

उशीर होऊनही आज
तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता 
आजचा दिवस खूप 
वेगळा होता.............................

५ मिनिटांच्या शांततेनंतर 
मीच तोंड उघडले
काही सांगायचे होते ??
असे हळूच विचारले...........................

"मला तुझ्याबरोबर नाही रहायचय.."
असं शांतपणे म्हणाली
वेदनेची लाट मनावर 
जोरात आदळली............................. 

समुद्रात बुडणारा सूर्य जणू
माझ्याकडे बघून हसत होता
आजचा दिवस नक्कीच खूप 
वेगळा होता................................

संध्याकाळच्या फिकट अंधारात 
ती हरवून गेली
जाता जाता डोळ्यात पाणी आणि
मनात यातना देऊन गेली.................... 

आज घरचा रस्ताही 
लांब वाटत होता 
कारण प्रेमाच्या शर्यतीत हा 
कासव केव्हाच हरला होता......................

राहून राहून एकच विचार 
मनात येत होता
आजचा दिवस नेहमीसारखा 
का नव्हता......???
का नव्हता..........???

                                                                       - संकेत मिसाळ

Wednesday, September 21, 2011

एक रात्र ..............अशीही

एक रात्र ..............अशीही 

खिडकीत उभा राहुनी 
शाध घेतो चंद्राचा 
तो ही खेळे लपंडाव 
आड लपुनी ढगांच्या .............

रातराणीच्या सुगंधाने 
रात्र  मोहरून  गेली 
मनाच्या थकव्याला कुठे 
दूर सारून गेली ......................

गाव सारा प्रकाशात 
चांदण्याच्या न्हाऊन गेला
चंद्र ही नभी करी 
चांदण्यान समवेत रासलीला ..................

रोज घाबरवणारा अंधार 
वाटू लागला आपलासा 
तोच आपल्याला शिकवी
मोल प्रकाशाचा ....................

चंद्र तारां समवेत गेली 
सुंदर रात्र सरून
पक्ष्यांन समवेत डोकावला
सूर्य क्षितीजा वरून ................

पण पुन्हा होईल रात्र 
पुन्हा पसरेल अंधार 
काय शोधायचे अंधारात 
तो ज्याचा - त्याचा विचार...................

                                                             - संकेत मिसाळ



Bus Stop

Bus Stop

रोजचीच बस 
रोजचाच प्रवास
बस stop भरलेला माणसांनी
तरी तो उभा एकटा उदास...................

ऐकून एक आवाज 
आला तो भानावर
नजर अडली त्याची 
तिच्या सुंदर रूपावर....................

तिला बघुनी छेडल्या 
त्याच्या हृदयीच्या तारा
रूप तिचे जणू
स्वर्गातील अप्सरा....................

प्रेमाच्या त्या पावसात 
तो चिंब भिजुनी गेला 
सुकलेल्या भावनांना 
नवा बहर  फुटला..................

पण वेगळेच होते 
नियतीच्या मनात 
स्वप्न भंगले जणू 
एका क्षणात...................

स्वप्न रंगवताना 
तो होता आपल्याच धुंदीत
भान आले तेव्हा ती होती
दुसर्याच्या मिठीत.........................

मनात त्याच्या पुन्हा 
प्रेमाचा दुष्काळ पडला 
भावनांचा बहर ही
कोमेजून पडला.................

पुन्हा तीच बस 
पुन्हा तोच प्रवास 
बस stop वर तो उभा 
एक एकटा एकटाच ..............
                         
                                                     - संकेत मिसाळ 

Friday, September 16, 2011

तसं काय लिहावं ते कळत नाही आहे पण तरीही प्रयत्न करतोय .....................!!!!!!!!!!!!!!!!!!!
काही चुकलं तर माफ करा............................!!!!!!!!!!!!!!!!