एक रात्र ..............अशीही
खिडकीत उभा राहुनी
शाध घेतो चंद्राचा
तो ही खेळे लपंडाव
आड लपुनी ढगांच्या .............
रातराणीच्या सुगंधाने
रात्र मोहरून गेली
मनाच्या थकव्याला कुठे
दूर सारून गेली ......................
गाव सारा प्रकाशात
चांदण्याच्या न्हाऊन गेला
चंद्र ही नभी करी
चांदण्यान समवेत रासलीला ..................
रोज घाबरवणारा अंधार
वाटू लागला आपलासा
तोच आपल्याला शिकवी
मोल प्रकाशाचा ....................
चंद्र तारां समवेत गेली
सुंदर रात्र सरून
पक्ष्यांन समवेत डोकावला
सूर्य क्षितीजा वरून ................
पण पुन्हा होईल रात्र
पुन्हा पसरेल अंधार
काय शोधायचे अंधारात
तो ज्याचा - त्याचा विचार...................
- संकेत मिसाळ